सावदा ता. रावेर :
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे नव्याने आलेले दबंग अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी बंद केले आहे त्यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ माजली आहे.
सावदा परिसर केळी उत्पादकांचा व व्यापाऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो या भागात कामगारांना रोज नगद मजुरी मिळत असते.यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. त्यामुळे अनेकांचे संसार अवैध धंद्यामुळे उघड्यावर पडत होते अनेक सामाजिक संस्था अध्यक्ष व राजकीय व्यक्तींनी अवैध धंदे बंद करण्याची मागणी लावून ठेवली होती, त्या अनुषंगाने सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेऊन घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
सावदा परिसरातील सर्व सामान्य जनता अवैध धंदे बंद असल्यामुळे खुश असली तरी अवैध धंदे चालक मात्र रोजच आपले धंदे चालू करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारीत आहे. यासाठी अनेक पोलीस शिपाई त्यांना थेट फौजदारांच्या केबिनमध्ये जागा मिळवून देऊन अवैध धंदे चालू करण्याची विनंती करीत असल्याने फक्त दिखावा म्हणूनच अवैध धंदे बंद राहू नये अशी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
सावदा परिसरामधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच गुटखा आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेऊन ग्रामसभेत याबाबत ठरावही घेण्यात आलेले आहेत.
सावदा हे आसपासच्या तीस चाळीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या या गावात अलीकडील काळात अवैध धंद्यानी जोर धरला होता परंतु एक महिन्या अगोदर सावदा पोलीस स्टेशनचा पदभार घेतलेले कर्तव्यदक्ष, दबंग अधिकारी म्हणून अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले, रियल सिंघम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी पदभार घेतल्या घेतल्याच अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाईचे फक्त संकेतच दिले नाही तर, धडक कारवाईची मोहीम हाती घेतली व अल्पावधीतच सावदा सह सावदा परिसरातील अवैध धंदे बंद केले. त्यांच्या या कारवाईमुळे जनसामान्यातून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घातल्यामुळे सावदा शहरात व परिसरात शांतता टिकून आहे.
हप्ते वाढवण्यासाठी अवैध धंदे बंद ?
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद असले तरी सावदा पोलीस ठाणे हद्दीतील काहीच कर्मचारी हे हप्ते वाढवण्यासाठी अवैधंदे चालकांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा परिसरात जोरदार पणे सुरु आहे. यामुळे फक्त दिखावा म्हणून तर अवैध धंदे बंद केले नाही ना अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Post a Comment