पुन्हा एकदा वाघोदा गावामध्ये गॅस्ट्रो येण्याची शक्यता ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

.    प्रतिनिधी ÷  करण तायडे                                         मोठा वाघोदा ग्रामपंचायत  ची पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आठ दिवसांपासून नाल्याच्या काठावर लिकेज आहे दीड दोन वर्षभरापुर्वी अशाच दुषीत पाणीपुरवठा केल्यामुळे शेकडो रुग्ण बाधित झाले होते उपरोक्त पाईप लाईन लिकेज बाबतीत आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांना माहिती देऊनही हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत का?का पुन्हा गावात गॅस्ट्रोची साथ येण्याची वाट पाहत आहे?किमान लिकेज असलेल्या लेंडीनाला परिसरातील घाण लक्षात घेऊन पाईप लाईन लिकेज बाबतीत संबंधित खबरदारी घेतील का? कि गॅस्ट्रोची साथ येण्याची वाट बघतील? त्यानंतर उपाययोजना करणार असा प्रश्न मोठा वाघोदा बु तालुका रावेर येथील निंभोरा रोडवरील रहिवासी असलेल्या नागरिकांना पडला आहे

0/Post a Comment/Comments