यावल प्रतिनिधी –
आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क
उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदवला.
गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते. मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता.
"अधिकारी वेळेवर येत नाहीत, पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते. म्हणून तीच ‘प्रामाणिक’ असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवलं," अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली.
या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर,आकाश बिऱ्हाडे सागर मेघे, विक्की तायडे, विशाल वाघमारे यांचा समावेश होता.
सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, सोशल मीडियावर या ‘खुर्ची सत्कार’चे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर "हे स्वागत होते की, टीका?" असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.
Post a Comment