
खिरोदा गावातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर लागत असलेला नाला म्हणजे घाणीच साम्राज्य या नाल्याकडे ग्रामपंचायत ला वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असते. गावातील सांडपाणी , गावातील कचरा सर्व या नाल्यात आणून टाकतात व पावसाळ्यामध्ये याचा त्रास सर्व आंबेडकर नगर मधील रहिवाश्यांना सहन करावा लागतो एवढंच नाही तर गावातील कचऱ्यामुळे या नाल्याची डेप्थ (खोली ) जी आहे ती कमी झाली आहे व पावसाळ्यात जंगलात होणाऱ्या पावसामुळं या नाल्याला महापूर येत असतो व या नाल्याची खोली कमी झाल्यामुळे पुराचे पाणी हे सर्व दलीत वस्ती मधील घरामध्ये शिरते नाल्यावरील असणारा पुला ची हाईट सुद्धा कमी झाली आहे तरी ग्रामपंचायत ला पुन्हा विनंती आहे की या नाल्याची साफसफाई व पुलाची हाइट वाढवण्याचा विचार करावा अन्यथा दलीत वस्तीतील विकास कामांना अडथळा आणणाऱ्या ग्रामपंचायती वर कारवाई करण्यात यावी ...
Post a Comment