मुक्ताईनगरातील इंदू हॉस्पिटलचे संचालक असलेल्या डॉक्टर दाम्पत्याचा नागरिकांना महत्वपूर्ण संदेश
फेसबुक अकाऊंट वरून केले आवाहन…
मुक्ताईनगर : कोरोनाची लक्षणे साधारणतः इतर सर्वच आजाराच्या लक्षणाप्रमाणे असल्याने नागरिक कोरोना चाचणी करणे टाळत असून खासगी डॉक्टरांकडून तात्पुरता उपचार करून अत्यवस्थ होण्याचे प्रमाण व याच काळात सर्विकडे कोरोना फैलाव करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे साधारणपणे दिसून येत आहे. त्यामुळे आता खासगी डॉक्टरांनीच कोविड चाचणी शिवाय रुग्ण हाताळू नये असा एक सूर सगळ्याच बाजूने उमटत असून याचसंदर्भात मुक्ताईनगर येथील पती पत्नी मिळून नव्यानेच स्थापण केलेल्या इंदू हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रवीण बोदडे व डॉ निकिता कांबळे- बोदडे यांनी फेसबुक या सोशल मीडिया अकाऊंट वरून नागरिकांनी कोविड चाचणी गरजेचे असल्याचे सांगत कोणतेही दुखणे अंगावर काढू नका आधी कोरोना चाचणी करा मगच पुढील उपचार करा असा मौलिक सल्ला दिला असून भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्या या पाऊलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शहरातील व तालुक्यातील इतरही डॉक्टरांनी हाच पवित्रा घेतल्यास नक्कीच शेवटच्या माणसातील कोरोना आजार नष्ट करण्यास मदत होईल असे सुज्ञ नागरिकांत बोलले जात आहे.
डॉ निकिता कांबळे – बोदडे यांच्या फेसबुक अकाऊंट वरून खालील प्रमाणे आवाहन करण्यात आलेले आहे.
साधारण नव्वदच्या दशकात किंवा जे माझे समकालीन लोक आहेत तुम्हाला सर्वांना आठवत असेल की, तेव्हा प्रत्येक घराच्या भितींवर लिहलेले असायचे ” कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो” किंवा “येता कणकण तापाची, तपासणी करा रक्ताची” अगदी तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच सर्वानाच सांगावस वाटत की, तुम्हाला ताप असेल, थकवा असेल, अंगदुखी असेल, संडास, उलट्या, सर्दी खोकला, गळा दुखणे यापैकी कुठलेही लक्षणे असल्यास आधी तुमची व तुमच्या आप्तजनांची कोविड चाचणी करून घ्या.
दोन दिवसांनी करतो, काल उन्हात फिरलो म्हणून आज अशक्तपणा वाटतोय…. कुलरमध्ये झोपलो म्हणून सर्दी झाली अशी कारण पुढे करून तपासणी लांबवु नका. कदाचित २-४ दिवसात तुमचे ताप व इतर लक्षणे निघूनही जातील पण तुमचा तो आलेला ताप, थकवा, सर्दी खोकला हा साधा ताप होता की कोविड होता हे तुम्हाला कदाचित कळणार नाही आणि जर तो करोना असला तर पुढचे ७-८ दिवस तुम्ही तो अजाणत्यारित्या इतरांना तुमच्या जवळच्या लोकांना पसरवत राहाल. तुम्ही त्यातून बरे झाले पण जे रुग्ण ज्यांचे वय जास्त आहे किंवा त्यांना इतर आजाराची पार्श्वभूमी आहे जसे की डायबेटिस, hypertension त्या रुग्णांना यातून बरे होण्यास बराचसा त्रास होतो. आणि काही रुग्ण यातून बरे सुध्दा होत नाहीत आणि तुम्हाला माहीत पण पडणार नाही की तुमच्या बेजबादारपणामुळे कुणाचा जीव गेला. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ कुटुंबाचे आधार ह्या जगातून निघून गेलेले आहेत.
लक्षात ठेवा तुम्हाला आलेला ताप, सर्दी खोकला, अशक्तपणा, अंगदुखी, संडास उलट्या हे करोनामुळे नाही आहे अशी सांगण्याची क्षमता कुठल्याही डॉक्टरांमध्ये नाही त्याला फक्त एकच पर्याय आहे…… आणि तो म्हणजे वरीलपैकी कुठलेही लक्षणे दिसल्यास करोनाची चाचणी करून घेणे. असे आवाहन
डॉ. प्रविण बोदडे ( एमबीबीएस,डीसीएच)
इंदू हॉस्पिटल, बालरुग्णालय व आयुर्वेद चिकित्सालय,
मुक्ताईनगर यांनी केलेले आहे
Congratulations dear friend
ReplyDeleteDr Pravin ..
For your service as a doctor at mukutainagar..
I am your 12 th classmate
And wishing your bright future...
Nice information at this stage
Covid 19 period....
Post a Comment